१ हजार रुपयांची लाच गादेगावच्या इसमाविरोधात अँटी करप्शनची कारवाई

पंढरपूर : eagle eye news

सी आर पी सी 107प्रमाणे दाखल असलेली चॅप्टर केस लवकर संपवतो म्हणून एक हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका खाजगी इसमाला रंगेहाथ पकडले असून त्याच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, या प्रकरणी फिर्यादी विरोधात पंढरपूर तहसील येथे सी आर पी सी १०७ प्रमाणे गुन्हा दाखल होता. त्यामुळे या गुन्ह्यात अटक वॉरंट न काढता ते लवकर संपवण्यासाठी भागवत जनार्दन बागल ( रा. गादेगाव तालुका पंढरपूर ) याने फिर्यादी कडून १ हजार रुपयांची लाच मागितली होती.

फिर्यादीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत संपर्क साधला होता. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून मंगळवारी तहसील कार्यालयाच्या आवारात एक हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Leave a Reply

error: Content is protected !!