मुख्यमंत्र्यांची थिल्लरबाजी ; मदतीसाठी तुमच्यात दम नाहीये का ?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

पंढरपूर : ईगल आय मीडिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गंभीर दौऱ्यावर आहेत, त्यांनी अशा प्रकारे थिल्लर बाजी करणे शोभत नाही. मदत करण्यासाठी तुमच्यात दम नाहीये का ? अशी विचारणा करीत राज्य सरकारने मदत किती देणार ते जाहीर करावं, दुसरीकडे बोट करू नये असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

व्हीडिओ पहा आणि यु ट्यूब चॅनेल subscribe करा

फडणवीस हे आज करमाळा, टेम्भुर्णी भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूर चे खा. जयसिद्धेश्वर स्वामी, आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आ. प्रशांत परिचारक, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारची कर्ज काढण्याची क्षमता आहे,मात्र यांना मदत द्यायचीच नाही. आम्ही 10 हजार कोटी रुपये देतो म्हणालो होतो, केंद्राची मदत कधी का येईना म्हणून. मात्र या सरकारला मदत द्यायची नाही म्हणून कधी केंद्राकडे बोट कर,कधी याच्याकडे बोट कर असे चालवले आहे.

मोदींनी मुख्यमंत्र्यांना फोन करून मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. ते देतीलच यांनी सांगावे किती देणार ते असे आव्हान करून फडणवीस पुढे म्हणाले की, केंद्राकडे जि एस टी ची रक्कम नाहीये, चुकीची माहिती देऊन गैरसमज पसरवले जात आहेत?

Leave a Reply

error: Content is protected !!