सहकार शिरोमणीच्या अर्ज छाननीत बड्या नेत्यांचीही वाढली धाकधूक
फोटो
सहकार शिरोमणी साठी दाखल अर्जावर सुनावणी वेळी युक्तिवाद करताना विरोधी पॅनेलचे उमेदवार
पंढरपूर : eagle aye news
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दाखल अर्जांवर हरकतींचा पाऊस पडला असून बचाव तसेच अर्ज उडवण्यासाठी घमासान युक्तिवाद रंगला होता. रात्री उशिरा पर्यंत छाननी ची प्रक्रिया सुरूच होती. कल्याणराव काळे, बी पी रोंगे, ad दीपक पवार अशा बड्या नेत्यांच्या आर्जांवर सुद्धा हरकती घेतल्या आहेत आणि त्यांचे निकाल राखून ठेवले आहेत. त्यामुळे पॅनल प्रमुखांची ही धाकधूक वाढली आहे.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या काळात २६४ एवढे विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. या दाखल अर्जाची छाननी आज शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांच्या समोर सुरू झाली. कारखान्याच्या उप विधीनुसार ज्या उमेदवाराचा प्रत्येक शेअर मागे २० गुंठे ऊस मागील पाच वर्षांपैकी ३ वर्षे गा आलेला नाही त्यांच्या अर्जावर सत्ताधारी काळे गटाने हरकती घेतल्या. या हरकती नुसार विरोधी पॅनेलचे प्रमुख डॉ. बी पी रोंगे, ad दीपक पवार यांच्याही अर्जावर गंडांतर आले आहे.
तर काळे गटाचे प्रमुख कल्याणराव काळे हे निशिगंधा सहकारी बँकेचे अध्यक्ष असल्याची आणि त्यामुळे काळे यांचा अर्ज अवैध करण्याची मागणी विरोधात पॅनल कडून करण्यात आली होती. याशिवाय संलग्न संस्थांची थकबाकी, अपुरी शेअर रक्कम, ऊस सलग ३ वर्षे गाळपासाठी न येणे अशा हरकती जवळपास सर्वच उमेदवारांना घेण्यात आल्या. निवडणुकीसाठी तीन पॅनल कडून उमेदवारी अर्ज दाखल असल्याने प्रत्येकाच्या अर्जावर हरकत घेतली गेली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी अगोदर अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व १० अर्ज मंजूर केले. वि जा. भ जा प्रवर्गातील केवळ एक अर्ज अवैध ठरला आहे. इमाव गटातील एक तर महिला गटातील ही ८ अर्ज अवैध ठरल्याचे उमेदवारांकडून समजते. दरम्यान, डॉ बी पी रोंगे, दीपक पवार यांच्यासह अनेक उमेदवारांचे निकाल राखून ठेवले आहेत. शुक्रवारी उशिरापर्यंत छाननी सुरू असून, नेमके किती अर्ज वैध आणि अवैध ठरले याची अंतिम यादी सोमवारी जाहीर केली जाईल असे निवडणुक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले.