अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जमीन मंजूर

सर्वोच्च न्यायालयात मिळाला दिलासा

टीम : ईगल आय मीडिया

वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी आज पत्रकार अर्णब गोस्वामी याना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. त्यांच्यासह आरोपी इतर दोन आरोपींना दिलासा दिलाय. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठानं अर्णव गोस्वामींसह इतर दोन्ही आरोपींना अंतरिम जामीन देण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र पोलिसांकडून अर्णव गोस्वामी यांना इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. या अगोदर याच प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं गोस्वामी यांना अंतिम जामीन देण्यास नकार दिला होता.

भारतीय दंडविधानाच्या कलम ३०६ नुसार रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असा युक्तीवाद ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर केला होता.

सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती चंद्रचूड यांनीही अर्णव गोस्वामींच्या अटकेवर प्रश्नचिन्ह आणि आश्चर्य व्यक्त केलं. सोबतच जामिनास नकार देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावरही न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी टिप्पणी केली.

‘आत्महत्या प्रकरण दाखल करण्यासाठी सक्रीयरित्या प्रोत्साहीत करावं लागतं. जर एखाद्या व्यक्तीवर पैशांचं देणं बाकी असेल तर ते आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचं प्रकरण ठरू शकतं का? एका व्यक्तीकडे दुसऱ्या व्यक्तीचं देणं बाकी आहे.

आर्थिक तणावाच्या कारणानं दुसऱ्या व्यक्तीनं आत्महत्या केली तर हे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं ठरतं का? कलम ३०६ अंतर्गत हा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो का? नाईक यांनी आर्थिक विवंचनेत तणावाच्या कारणानं आत्महत्या केली. ताब्यात घेऊन चौकशी करण्याजोगं हे प्रकरण आहे का?’ अशी टिप्पणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी यावेळी केली.

Leave a Reply

error: Content is protected !!