हे वारकरी दाम्पत्य महापूजेचे मानकरी

मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेला उपस्थित राहण्याचा मिळाला मान

पंढरपूर : ईगल आय मीडिया

आषाढी एकादशी च्या महापुजेसाठी वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत श्री विठ्ठल रुक्मिणी ची आषाढी एकादशीची महापूजा करण्याचा मान विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) या दांपत्यास मिळाला आहे. हे दांपत्य वर्धा जिल्ह्यातील आहे

कोरोना संसर्गामुळं वारी पांरपारिक पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं होण्याऐवजी नियमांसह होत असल्यानं मानाचा वारकरी निवडण्याची परंपरा बदलण्यात आली आहे. गेल्या 20 वर्षापासून ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. आज मंदिरातील सहा विणेकऱ्यांमधून चिट्ठी टाकून मानाचा वारकरी निवडण्यात आला.

आषाढी वारी दरम्यान मानाचा वारकरी निवडताना एकादशीच्या दिवशी दर्शन रांगेत विठ्ठल मंदिर प्रवेश दारावर असणाऱ्या वारकरी दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान दिला जातो. मात्र, कोरोनामुळं मंदीर बंद असल्यानं मंदिराचे सेवेकरी यांच्यात चिठ्ठी टाकून गेल्यावर्षी आणि यंदाही निवड करण्यात आली.

केशव कोलते 20 वर्षा पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. त्या सेवेचं त्यांना महापुजेच्या निमित्तांन फळ मिळाल्याचं म्हणावं लागेल. महापूजेचा मान मिळाला आहे कष्टाचं फळ मिळालं असून 2000 मध्ये पंढरपूरला आलो. पांडुरंगाकडे कोरोना नष्ट व्हावं, असं मागणं असल्याचं केशव कोलते यांनी सांगितलं. 1972 पासून वारी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

error: Content is protected !!