यशस्वी विद्यार्थिनी , क्र. 1 ) ऋतुजा व्यवहारे, 2) ज्ञानेश्वरी डंके, 3) आम्रपाली गावडे
टीम : ईगल आय मीडिया
आष्टी ( ता.मोहोळ ) येथील नूतन विद्यालयाचा इयत्ता 10 वीचा निकाल 100 टक्के लागला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मार्च २०२० मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परिक्षेचा नुतन विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेस विद्यालयातुन एकुण १२२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ५६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य , ३३ विद्यार्थी प्रथम श्रेणी , ३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत ऊत्तीर्ण असुन ३ जण फक्त ऊत्तीर्ण झालेत.
विद्यालयात ऋतुजा बाळासाहेब व्यवहारे ९४.४०%, ज्ञानेश्वरी जगदिश डंके ९४.२०%, आम्रपाली धनाजी गावडे ९३.४०% यांनी अनुक्रमे प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
सर्व ऊत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक प्रा. वसेकर , पर्यवेक्षक प्रा. हेरले , प्रा.कस्तुरकर , प्रा.चांदुडे , प्रा.हनुमंत मते , प्रा. पवार , प्रा. दरेकर व इतर शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
या ऊत्तुंग यशाबद्दल ऐ.प. दि. जैन पाठशाळा संस्थेचे मानद सचिव रणजित भाई गांधी , पराग शहा, भूषण शहा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यशाबद्दल सर्व स्तरातुन मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.