खेडभोसेच्या उपसरपंचपदी अश्विनी पवार यांची बिनविरोध निवड


पंढरपूर : eagle eye news
खेडभोसे ( ता. पंढरपूर )  ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विठ्ठल परिवाराच्या सौ अश्विनी चंद्रकांत पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


यावेळी नूतन सरपंच सुरेखा देवळे, माजी उपसरपंच छाया पवार, तलाठी प्रकाश भिंगारे, पोलीस पाटील नंदिनी गवळी, नूतन ग्रामपंचायत सदस्या सुमन पवार, शुभांगी साळुंखे, जयश्री सुतार, पुष्पा बनसोडे, अशोक पवार, पांडुरंग पवार, विकास पवार, सागर क्षीरसागर उपस्थित होते.


खेडभोसे (ता. पंढरपूर)  ग्रामपंचायतीवर  विठ्ठल परिवाराचे बहुमत आहे. सरपंच सुरेखा देवळे या जनतेतून निवडून आल्या आहेत. उपसरपंच निवडीसाठी आज सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्यांची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी अश्विनी चंद्रकांत पवार यांचाच एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अमृत सरडे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.


या निवडीवेळी विठ्ठल कारखान्याचे संचालक कालिदास साळुंखे, माजी चेअरमन बाबुराव पवार, पांडुरंग साखर कारखान्याचे माजी संचालक ब्रह्मदेव पवार, दिलीप पवार, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे माजी संचालक बंडू पवार, संजय देवळे, माजी उपसरपंच सुरेश पवार, सिध्देश्वर दे. पवार, सिद्धेश्वर पाटील, पोपट पवार, शहाजी जमदाडे, प्रशांत जमदाडे, संतोष अ. पवार,  बाळकृष्ण पवार, बापू जमदाडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


फोटो ओळी  खेडभोसे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अश्विनी पवार यांची निवड झाल्यानंतर जल्लोष करताना सरपंच सुरेखा देवळे यांच्यासह नूतन उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ.

Leave a Reply

error: Content is protected !!