आव्हे – तरटगाव च्या सरपंचपदी शोभा कांबळे

तर उपसरपंचपदी राणू पाटील यांची निवड

पंढरपूर : ईगल आय मीडिया

आव्हे-तरटगाव (ता. पंढरपूर ) ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी परिचारक गटाचे शोभा संजय कांबळे , तर उपसरपंचपदी राणू मधुकर पाटील. यांची बिनविरोध निवड करण्यात आली. येथील ग्रामपंचायतीचे आरक्षण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित होते.

9 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीसाठी बोलाविलेल्या बैठकीला राणू पाटील उमेश माने, संतोष कांबळे, हिराबाई करवर, शामल पाटील, सीता शेंबडे, लक्ष्मी बनसोडे, भामाबाई कांबळे, शोभा कांबळे हे सदस्य उपस्थित होते. यावेळी सरपंच पदासाठी शोभा कांबळे तर उपसरपंच पदासाठी राणू पाटील या दोघांचेच अर्ज दाखल झाले होते.

त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी गोरखनाथ रामगुडे यांनी त्यांची निवड जाहीर केली. निवडीनंतर सरपंच, उपसरपंचा सहित
नवनिर्वाचित सदस्यांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामसेविका व्ही. एस.माळी , तलाठी ए.एस.कोळी, हवालदार अरुण राजकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!