वाखरीजवळ आयशर ट्रक पेटला

शेतमाल जळून लाखोंचे नुकसान

पंढरपूर : ईगल आय मीडिया

कॅरेटमध्ये शेतमाल भरून निघालेला आयशर कंपनीचा माल वाहतूक कंटेनर पेटल्याने ट्रक, आतील कॅरेट आणि शेतमाल जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आज संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास वाखरी (ता. पंढरपूर ) जवळ ही घटना घडली आहे.

शेतमाल प्लास्टिक च्या कॅरेट मध्ये भरून निघालेल्या आयशर कंपनीच्या नवीन ट्रकला पंढरपूर – वाखरी मार्गावर विनायक व्यापारी संकुल लोखंडे वस्ती येथे थांबून काही ठिकाणी वेल्डिंग करण्यात येत होती. यावेळी वेल्डिंगच्या ठिणग्या उडाल्याने प्लास्टिक कॅरेटनी पेट घेतला. आणि आगीचा भडका उडाला.

यावेळी ट्रक मधील बहुतांश कॅरेट जळून गेले. आतील शेतमाल ही जळून गेला. आगीचा भडका उडताच रस्त्याने ये जा करणारी वाहने थांबली आणि एकच गोंधळ उडाला. मोठ्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले मात्र ट्रक चे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!