पंढरपूर : ईगल आय मीडिया.
बाभळगाव ( ता. पंढरपूर ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध बंद आंदोलनास पाठिंबा म्हणून ग्रामदैवत शंभूमहादेवाच्या पिंडीला दुधाचा अभिषेक करण्यात आला.
यावेळी पंढरपूर – माढा विधानसभा मतदार संघ शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष नानासाहेब चव्हाण यांच्या उपस्थितीत हा दूधा अभिषेक करण्यात आला.
दुधाला प्रति लिटर दहा रूपये ज्यादा दर राज्य सरकारने द्यावा व मागील चार महिन्यातील दुधावरील अनुदान त्वरित दूध उत्पादकांना देण्यात यावे. त्याचबरोबर पशुखाद्याचे वाढलेले दर हे सुद्धा कमी करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष नानासाहेब चव्हाण यांनी यावेळी केली. या आंदोलनावेळी चेअरमन गणेश गांडूळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.