सरपंचपदी ज्योती गणेश चव्हाण तर उपसरपंचपदी श्रीपाद चव्हाण
पंढरपूर : ईगल आय मीडिया
बाभुळगाव (ता.पंढरपूर ) ग्रामपंचायत सरपंचपदी परिचारक गटाच्या ज्योती गणेश चव्हाण तर उपसरपंचपदी श्रीपाद वसंत चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत एकूण 11 जागांपैकी 8 जागा जिंकत परिचारक गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले.
बाभुळगाव ग्रामपंचायत 1958 साली स्थापन झाली. 1978 सालापर्यंत सरपंच बिनविरोध निवडला जायचा. पहिले बिनविरोध सरपंच म्हणून त्रिंबक हरिभाऊ चव्हाण यांना मान मिळाला होता. 1978 साली पहिली ग्रामपंचायत निवडणूक लढवली गेली. आजपर्यँत बाभुळगाव ग्रामपंचायतीच्या 9 निवडणूका पार पडल्या.
यापैकी 5 निवडणुकांमध्ये परिचारक गटाने विजय प्राप्त केला आहे. यावेळी पांडुरंग साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पार पडली. भालके -काळे गटाचा धुव्वा उडवत परिचारक गटाने विजय प्राप्त केला.गेल्या 40 वर्षापासून दिलीप चव्हाण परिचारक गटाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून कार्य करत आहेत. दिलीप चव्हाण 1984 ते 89 या कालावधीत सरपंच होते. आता त्यांची सून ज्योती गणेश चव्हाण यांची सरपंच म्हणून निवड झाली.
यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य अश्विनी बलराज चव्हाण, बाळासाहेब लटके, स्वाती अमोल कोरके, कल्पना महादेव रुपनर, कविता अनिल माळी, संगीता गणपत माळी, सुवर्णा अशोक सरवदे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरडे, ग्रामसेवक इंगोले, प्रदीप चव्हाण यांनी काम पाहिले.
यावेळी दिलीप चव्हाण, वसुदादा चव्हाण, अभिमान चव्हाण, रमेश चव्हाण, विष्णू चट्टे, नितीन चव्हाण, शहाजी चव्हाण, औदुंबर माळी, परमेश्वर चव्हाण, नागनाथ राजमाने, संभाजी चव्हाण, वसंत राजमाने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.