ढाल तलवार मिळताच शिंदे गटाच्या सैनिकांचा जल्लोष


 पंढरपुरात संत नामदेव पायरी येथे पक्ष चिन्हाचे पूजन 


फोटो :  शिवसेनेचे सोलापूर लोकसभा विभाग संपर्कप्रमुख महेश साठे व कार्यकर्ते जल्लोष करताना


प्रतिनिधी : पंढरपूर 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर पंढरीत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. दरम्यान, शिंदे गटाच्या पक्षाला मिळालेले निवडणूक चिन्ह मराठी लढाऊ बाण्याचे आणि अस्मितेचे प्रतीक असल्याचे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी यावेळी सांगितले.


शिवसेनेचे नेते उद्धव  ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनुष्य बाण या मूळ पक्षचिन्हावर दावा केला होता. मात्र निवडणुक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवून दोन्ही गटाला वेग-वेगळी चिन्हे दिली होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्या  शिवसेनेला मंगळवारी ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले. यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेचे सोलापूर लोकसभा विभागाचे संपर्क प्रमुख महेश साठे यांनी  या चिन्हाचे पूजन या चिन्हाचे  पुजन संत नामदेव महाराज समाधी येथे केले आहे.यावेळी सोलापूर लोकसभा विभागाचे संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणी मंदिरा जवळील नामदेव पायरी येथे ढाल तलवार निवडणुक चिन्हाचे पूजन केले. हीच ढाल तलवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट दिली जाणार सांगितले.


 यानंतर  कार्यकर्त्यांनी पंढरपुरात जोरदार जल्लोष साजरा केला. यावेळी लक्ष्मीटाकळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय साठे, सोनु माने, बापू डोंगरे, दादा कदम, गणेश पवार, सतिश काळे, सदानंद वाघमारे, बडवे, पप्पू तांबोळी, सोहील अत्तार, तात्या घाडगे, सोनू चव्हाण, रमेश दुबल, बंडु दुबल, शुभम माने, ज्योतीराम नलवडे, शुभम जगदाळे, योगेश गायकवाड, दयानंद साठे, समर्थ साठे, दत्ता शेटे, महेश फराटे, अविनाश देवकते, रणजीत पवार, रोहन बुचुटे, विनायक वरपे, दिनेश कोरके, अमर बंदपट्टे उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!