बळीराजा प्रतिष्ठानची सामाजिक बांधिलकी

गरीब, वयोवृद्धांना दिवाळी निमित्त फराळ आणि पोशाख भेट


  पंढरपूर : ईगल आय मीडिया

  शेळवे (ता. पंढरपूर ) येथील बळीराजा प्रतिष्ठानच्या वतीने गावातील सुतार, कोतवाल यांच्यासह  वयोवृद्ध आणि गरीब कुटुंबांना दिवाळी फराळ आणि पोशाख भेट देण्यात आला.  शेळवे येथील बळीराजा प्रतिष्ठानने यावर्षी दिवाळीचे औचित्य साधून  गरीब आणि कर्तृत्वान लोकांची दिवाळी सामाजिक बांधिलकी या नात्यातून  गोड केली आहे. गुरुवारी या कुटुंबांच्या घरी जाऊन दिवाळी फराळ आणि पोशाख भेट दिला गेला।    

     यासंदर्भात बोलताना बळीराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गाजरे म्हणाले, बळीराजा प्रतिष्ठान नेहमी सामाजिक काम करत आले आहे,  यावर्षी आम्ही हा उपक्रम राबवला आहे.समाजासाठी राबलेल्या लोकांच्या आनंदात सहभागी होता आले याचे समाधान मिळते आहे.  

        शेळवे गावातील बळी सुतार , जगू कोतवाल ,सिंधुबाई साळुंखे , सुसाबाई ताठे, चांगदेव गाजरे यांचा सपत्नीक पोशाख देऊन सन्मान केला. यावेळी बळीराजा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!