बंडगार्डनचा विसर्ग 21 हजार तर वीरचा विसर्ग कमी झाला

उजनीच्या पाणी साठ्यात वेगाने वाढ

पंढरपूर : ईगल आय मीडिया
शुक्रवारी सकाळी 6 वाजता भीमा नदीत येणार विसर्ग वाढला असून पुणे बंडगार्डन येथे 21 हजार 277 क्यूसेक्स ने पाणी येत आहे. तर वीर धरणातून नीरा नदीत सोडणारा पाण्याचा विसर्ग कमी झाला असून तो सकाळी 9 वाजता 22 हजार 860 क्यूसेक्स करण्यात आला आहे.

भीमा खोऱ्यातील खडकवासला हे मोठे धरण 100 टक्के भरल्याने बंडगार्डन येथे येणारा विसर्ग वाढवला आहे. सकाळी उजनीच्या पाणी साठ्यात 32.29 टक्के एवढी वाढ झाली आहे. उजनीच्या पाणी साठ्यात वेगाने वाढ होत असून शेतकरी आनंदित झाला आहे.

निरेच्या खोऱ्यातील चारही धरणे सध्या भरण्याच्या परिस्थितीत आहेत. त्यामुळे वीर धरणाच्या 7 गेट मधून नीरा नदीत शुक्रवारी सकाळी 9 वाजता विरमधील विसर्ग 22 हजार 860 क्यूसेक्स एवढा करवण्यात आला आहे.
पावसाच्या प्रमाणानुसार नदीच्या विसर्ग सोडण्याच्या प्रमाणात आणखी बदल होऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, भीमेच्या खोऱ्यातील खडकवासला हे मोठे धरण 100 टक्के भरले असून या धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच उजनीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!