पंढरीत रुग्ण संख्या 31 पर्यंत गेली
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहरातील बँकेच्या कोरोना बाधित संचालकाच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी रात्री उशिरा निष्पन्नन झाले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 28 झाली असून ग्रामीण सह तालुक्यातील रुग्ण संख्या 31 वर पोहोचली आहे.
पंढरपूर शहरातील एका बँकेचा संचालक असलेल्या शिक्षक व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. तो संचालक बँकेच्या संचालक मिटींगला हजर राहिला होता. त्यामुळे बँकेचे अन्य 4 संचालक कोरोना बाधित झाले आहेत.
त्या बाधित संचालकांपैकी एका संचालकाच्या मुलास संपर्कातून कोरोना पॉझिटिव्ह ठरला आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा अन्य एका संचालकाच्या पत्नीसही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आलेला आहे. पंढरपूर शहर सध्या 27 तर ग्रामीण भागात 3 असे तालुक्यात एकूण 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यामध्ये एकाची भर पडून शहरातील संख्या 28 झाली आहे. 22 रुग्ण वाखरी येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत आहेत. आजवर 8 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.