बारामतीत घुमला नाद ! एक मराठा लाख मराठा !!
टीम : ईगल आय मीडिया
राज्यात मराठा आरक्षण स्थगिती नंतर पुन्हा पेटून उठलेल्या आणि रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाचा एक मराठा लाख मराठा हा आवाज थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर घुमला. बारामती येथील अजित पवारांचे निवासस्थान असलेल्या सहयोगनगर सोसायटी समोर मराठा समाजाने शनिवारी सकाळी आंदोलन छेडले आहे.
बारामती येथील पी एन जी चौकात एकत्र आल्यानंतर मराठा समाजातील मोर्चेकरी घोषणाबाजी करीत सहयोगनगर येथील अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर थडकले. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त असून मोर्चेकर्यांना सोसायटीच्या बाहेरच रोखून धरण्यात आले. त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मराठा समाजाचे आरक्षण कायम करण्यात यावे, आरक्षण लागू झाल्यानंतर च पोलीस भरती करण्यात यावी आशा प्रकारच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग पाळण्यात आले होते. तसेच सर्व आंदोलकांनी मास्क, स्यानेटाईझर ही वापरल्याचे दिसून आले.