टीम : ईगल आय मीडिया
बडोदे (गुजरात ) येथे काम सुरू असलेली तीन मजली इमारत मध्यरात्री कोसळल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली आहे. दरम्यान, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बडोद्यातील बावानानपूरा येथील मध्यरात्रीच्या सुमारास काम सुरू असलेली तीन मजली इमारत कोसळली. स्थानिकांनी दिलेल्या माहिनुसार, “सर्वप्रथम ही इमारत एका बाजूला झुकली होती. लोकांनी याबाबत त्याची तक्रारही केली. परंतु प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.” दरम्यान, सोमवारी रात्री अचानक ही इमारत कोसळली आणि या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळाताच बचावकार्यासाठी सर्व टीम घटनास्थळी पोहोचल्या. तसंच सध्या या इमारतीखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.