बार्शीच्या नागराध्यक्षांना कोरोनाची बाधा


फेसबुकवर पोस्ट करून दिली माहिती

बार्शी : ईगल आय मीडिया

बार्शीचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तांबोळी यांनी स्वतःच ही माहिती फेसबुकवर पोस्ट करून दिली आहे.
बार्शी शहरात कोरोना आणि चर्चेचे गुर्‍हाळ हे एक समिकरण होऊन बसले आहे. मग ती चर्चा गल्ली बोळात असो अथवा सोशल मिडीयावर. पण चर्चेचा विषय एकच कोरोना!

गेल्या तीन दिवसांपासून बार्शीमध्ये अशाच एका चर्चेचे गुर्‍हाळ सुरू होते. ती म्हणजे बार्शीचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांना कोरोना झाल्याचे. गल्लीतील प्रत्येक कटट्यावर हीच चर्चा. परंतु, रविवारी स्वतः नगराध्यक्ष तांबोळी यांनी फेसबूकवर आपल्याला कोरोना झाला असून आपणावर जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची पोस्ट केली आणि या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
लवकरच कोरोनावर मात करून बार्शीकरांचा सेवेसाठी रूजू होणार असल्याची भावनिक साद अ‍ॅड. तांबोळी यांनी यावेळी फेसबूक पोस्टमधून बार्शीकरांना घातली. अ‍ॅड. तांबोळी यांच्या पोस्टलाही अनेक बार्शीकर नेटीजन्सनी प्रतिसाद दिला आहे. तसेच अ‍ॅड. तांबोळी यांनी लवकरच कोरोनामुक्त व्हावे यासाठी आपण ग्रामदैवत भगवंताला साकडे घालतोय अशा प्रतिक्रिया सोशल मिडीयावर नोंदविल्या आहेत.
बार्शी शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून आता शहराच्या प्रथम नागरिकास ही कोरोनाने गाठले असून शहरात कोरोनाची काळी सावली अधिक गडद होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!