शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्याध्यापकांचा कोरोनामुळे मृत्यू

वाखरी आश्रमाशाळेच्या मुख्याध्यापकांचा कोरोनामुळे मृत्यू

पंढरपूर : ईगल आय मीडिया

शिक्षक दिनाच्या पूर्व संध्येला भटक्या, विमुक्त जाती, जमातीमधील हजारो विद्यार्थी घडवणाऱ्या विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या बाबतचे वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वाखरी ( ता. पंढरपूर ) येथील लक्ष्मणदास महाराज प्राथमिक आश्रमाशाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत भगत यांचा शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या उपचार सुरू असताना कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाच्या काळातही दररोज शाळेवर येऊन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करणारेसूर्यकांत भगत यांना शुक्रवारी सकाळपासून त्रास जाणवू लागल्यावर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे त्यांचा सायंकाळी मृत्यू झाला. आज सकाळी कोरोनाच्या नियमानुसार पंढरपूर नगरपालिकेकडून त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले . 52 व्या वर्षी कोरोनामुळे अकाली मृत्यू झाल्याने भगत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे . कडक शिस्तीचे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये ते प्रिय होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले भटक्या जाती, जमातीतील हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालकही या घटनेनंतर हळहळ व्यक्त करीत आहेत.
आरोग्य विभागाच्यावतीने शनिवारी आश्रमशाळेतील त्यांच्या सहकारी शिक्षकांची कोरोना चाचणी घेणार आहे . शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षकांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

2 thoughts on “शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्याध्यापकांचा कोरोनामुळे मृत्यू

  1. आदरणीय भगत सर खूपच शिस्तप्रिय होते. संघर्षमय आयुष्यात त्यांनी संकटाचा सामना धीरोदात्तपणे करणारे सरांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  2. सुमारे 30वर्षापूर्वी मी पहिलीच्या वर्गात जाण्यासाठी खूप घाबरत होतो. आदरणीय भगत सरांनी मला एक चित्रांचे नवीन पुस्तक खूपच मायेने दिले. त्यांच्या त्या कृतीमुळे माझी शाळेबद्दलची मनातील भीती दूर झाली. धन्यवाद सर.

Leave a Reply

error: Content is protected !!