सावधान : उजणीतून भीमेला पाणी सोडले

वीर धारणातूनही निरेला विसर्ग सुरू केला

पंढरपूर : ईगल आय न्यूज

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे उजनीतून भीमेला आणि वीर धरणातून निरा नदीला सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात भीमा नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहणार आहे.

उजनी च्या पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाची संततधार सुरू आहे. शिवाय उजनी धरणात 110.59 टक्के इतका पाणी साठा झाला आहे. पुणे जिल्ह्यातून 6 हजार 884 क्यूसेस ने अवाक सुरू आहे. त्यामुळेच भीमा नदीला पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे.


मंगळवारी रात्री 9 वाजता उजणीतून सांडव्या द्वारे 50 हजार क्यूसे विसर्ग सुरू केला आहे. तर वीज निर्मितीसाठी 1600 क्यूसे पाणी सोडले जात आहे. इकडे वीर धरणातूनही निरा नदीला पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी रात्री 9 वाजता वीर मधून निरेला 6 हजार 637 क्युसेक पाणी सोडले जात आहे. मंगळवारी रात्री पंढरपूर येथे भीमा नदीला 9 हजार 923 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.


उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने भीमा नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा ईशारा दिला आहे. 8 दिवसात पुन्हा एकदा भीमेला पाणी आल्याने शेतकऱ्यांना आणखी एकदा पुराची काळजी लागली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!