अभिजित पाटील यांनी जबाबदारीने बोलावे


 109 कोटींच्या थकबाकीचा आकडा चुकीचा : भगीरथ भालके  यांचा आरोप 

टीम : ईगल आय न्यूज


 कारखान्याच्या निवडणुक प्रचारात अभिजित पाटील पोकळ आरोप करून बालीशपणे  बोलत होते. परंतु आता ते चेअरमन झाले आहेत. अजूनही ते अभ्यास न करता, निराधार आरोप करत आहेत. यामुळे पाटील यांनी बलिशपणा सोडून  जबाबदारीने बोलावे, असा सल्ला श्री  विठ्ठल सह. साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी नूतन चेअरमन अभिजित  पाटील यांना दिला.

श्री विठ्ठल च्या चेअरमन पदी  निवड झाल्यानंतर अभिजीत पाटील यांनी 109 कोटी रुपये थकबाकी वसुली संदर्भात वक्तव्य केले होते.. यासंदर्भात उत्तर देण्यासाठी भगीरथ भालके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दत्तात्रय चौगुले, धनाजी घाडगे आदी उपस्थित होते.


 पुढे बोलताना भालके म्हणाले, पाटील यांनी कोणतीही आकडेवारी तपासली नाही. मात्र १०९ कोटी रुपयांची आकडा आला कुठून ? माझ्याकडे किंवा भालके कुटुंबाकडे थकबाकी शिल्लक असती तर मला निवडणूक लढवता आली नसती. वस्तुस्थिती कडे दुर्लक्ष करून खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. पुरावे दाखवा, मोगम आरोप करू नका असे आवाहन करुन व्यक्तिगत बदनामी करण्याचे काम सुरू असूनही ती थांबवावी अन्यथा कायदेशीर करवाईसुद्धा करू असाही ईशारा दिला. 

अभिजित पाटील यांनी 2 हजार 500 रुपये दर देण्याचे जाहीर केल्यासंदर्भात बोलताना भालके म्हणाले की, भारत भालके चेअरमन असताना  विठ्ठल कारखान्याच्या उसाला २००९-१०, २०१०-११ या सालात २५७५ रुपये दर दिला आहे तर तेवढा दर देण्याचा कामाच्या दृष्टीने तुम्ही कामाला लागा, आम्ही सहकार्य करू.  विठ्ठल सेवा संघाची जेवढी उलाढाल नाही तेवढे आकडे सांगितले जात आहेत.

कारखान्याची थकबाकी असणाऱ्या २९८ पैकी १९५ लोकांवर आम्हीच कारवाई केली आहे. आम्हीही थकबाकीदारांना नोटीस दिली आहेत. काही प्रकरणी न्यायालयात आहेत. परंतु बगल बचच्यांना पैसे दिले असा आरोप होतोय. त्यांनी ते सिद्ध करावे. लहान, येड्या गबाळ्या सारखी वक्तव्य करू नका. संस्थेची बदनामी होईल असे बोलू नका. तुमच्या प्रश्नाचे उत्तरे तुम्ही जेथे बोलावलं तेथे येऊन देतो असे आव्हान भालके यांनी दिले.

Leave a Reply

error: Content is protected !!