भगीरथ भालके यांची टीका : भोसे कार्यकर्त्यांनी दिला ९९ हजार ९९९ रुपयांचा निधी
पंढरपूर : प्रतिनिधी
मंगळवेढा – भोसे रस्त्याने 3000 कोटीच्या विकासाचा बुडबुडा दाखवून दिला आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना नरक यातना सोसाव्या लागत आहेत, याचा विचार या लोकप्रतिनिधीने कधी केला का असा सवाल महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी व्यक्त केला. दरम्यान भोसे येथे कार्यकर्त्यांनी भगीरथ भालके यांच्यासाठी ९९ हजार ९९९ रुपयांची लोकवर्गणी जमा केली. मंगळवारी भालके यांनी निंबोणी, चिक्कलगी, शिरनांदगी, मारोळी, ममदाबाद हु.,लोणार, पडोळकरवाडी,रेवेवाडी, मानेवाडी, भोसे, रड्डे या गावाचा दौरा केला.
यावेळी दामाजी सहकारीचे उपाध्यक्ष तानाजी खरात, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, दामाजीचे संचालक बसवराज पाटील,भारत बेदरे, सुरेश कोळेकर,पांडूरंग चौगुले, समाधान फाटे,मुरलीधर दत्तु, ऍड रविकिरण कोळेकर,अर्जुन पाटील,मारुती वाकडे, ऍड राहुल घुले, नितिन पाटील, गुलाब थोरबोले, सैपन शेख, बाळासाहेब पाटील, पंडीत पाटील, राजू गाडवे, महावीर बंडगर, दौलत माने, राजू गाडवे, सत्तार इनामदार, अशोक माने, अर्जुन पाटील,सुनिल लोख॔डे, संदीप फडतरे महेश दत्तू हरिभाऊ मळगे आदी उपस्थित होते.
यावेळी भालके म्हणाले की, ही निवडणूक माझ्यापेक्षा जनतेसाठी महत्त्वाची आहे निवडणुकीच्या तोंडावर अनेकांना अमिष दाखवले जात आहेत.त्याच अमिषाला बळी पडून समविचारतील एक जण गेला परंतु ९९९ जण माझ्या पाठीशी असल्यामुळे येणारी निवडणूक जनतेनीच हातात घेतल्यामुळे या भागातील शेतीचे पाणी, पीक विमा, दुष्काळ या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला जनताच बाजूला सरणार आहे. यावेळी समाधान फाटे,पांडुरंग चौगुले, राहुल घुले,यांची भाषणे झाली.
काँग्रेस उमेदवाराची शिरनांदगी येथे बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली तर निंबोणी येथे विद्यमान ग्रामपंचायत सदस्यातील सात सदस्यांनी भगीरथ भालके यांना पाठिंबा दिला.स्व. आ. भारत भालके यांनी सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, यांना आधार देण्याचे काम केल्यामुळे त्यांच्या निधनानंतर देखील भोसे सारख्या परिसरामध्ये तरुणांनी व्हाट्सअप स्टेटस, त्याची गाणी ठेवली म्हणून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. परंतु तुम्ही कितीही दबाव आणा पण जनतेच्या मनातील स्व.भालकेचे स्थान कधीही बाजूला करू शकणार नाही. मला उमेदवारी मिळू नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते, परंतु ही निवडणूक आता प्रचाराच्या शुभारंभ करताना जनतेने सांगितले की भगीरथ ही तुझी निवडणूक नसून ही निवडणूक तुझी आमचीच निवडणूक समजून लढतोय. त्यामुळे जनतेच्या हातात गेलेल्या निवडणूकीचा निकाल जनताच लावणार आहे.
मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा देणारे स्वर्गीय भारत भालके कुठे आणि मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे – पाटील यांच्यावर एसआयटी चौकशी लावा म्हणून फडणवीसची बाजूने बाके वाजवणारा विद्यमान आमदार कुठे अस सवाल यावेळी बोलताना उपस्थित केला.