राष्ट्रवादी ची उमेदवारी भगीरथ भालके यांना जाहीर

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ट्विट

पंढरपूर : ईगल आय मीडिया

अखेर पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकिसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ने भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून भगीरथ भालके यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्याचबरोबर पाटील यांनी भगीरथ भालके नक्कीच विजयी होतील असा विश्वास ही व्यक्त केला आहे.

पंढरपूर मतदारसंघाचे आमदार दिवंगत भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आज राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्या मान्यतेने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटले आहे. भगीरथ भारत भालके हे पंढरपूर मतदारसंघातून नक्की विजय होतील असा विश्वास व्यक्त करतानाच भगीरथ भालके यांना जयंत पाटील यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक लागली असून भाजपकडून उद्योजक समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली गेली आहे. मात्र राष्ट्रवादी कडून भगीरथ भालके की दिवंगत आम भारत भालके यांच्या पत्नी जयश्री ताई भालके यांना मिळते याकडे लक्ष लागले होते.

आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस ने अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली आहे. मागील चार दिवसांपासून भगीरथ भालके यांनी आपणच उमेदवार आहोत असे सांगत प्रचार सुरू केला आहे. आता समाधान अवताडे आणि भगीरथ भालके यांच्यात थेट सामना निश्चित झाला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!