भारत नानांची अपूर्ण कामे भगीरथ पूर्ण करतील!

जलसंपदा मंत्री जयंत पाटील : मंगळवेढा येथे कार्यकर्ता बैठक संपन्न

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

स्व भारत नानां नी 35 गावापैकी 24 गावांना एक टी एम सीवरून दोन टीएमसी पाणी मंजूर करण्याचे काम केले आहे. त्याचा एक मी साक्षीदार असून भारत नानांची राहिलेले अपुर्ण काम भगिरथ भालके हेच पुर्ण करतील, असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले. ते श्रीराम मंगल कार्यालय येथे गणवाईज कार्यकर्ता विचार विनिमय आयोजित बैठकीत बोलत होते . सुरूवातीला स्व. भारत नाना भालकें यांच्या फोटोचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्ता मामा भरणे, जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे, उत्तमराव जानकर, दिपक आबा साळुंखे- पाटील, आ संजय मामा शिंदे, शिवसेना नेते गणेश वानकर, उमेश पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ऍड. नंदकुमार पवार, पी. बी. पाटील, नगरसेवक अजित जगताप, जिप सदस्य नितीन नकाते, नगराध्यक्षा अरूणा माळी, भारत नागणे, पांडुरंग नाईकवाडी, दयानंद सोनगे, संतोष सोनगे, मुझमिल काझी, भारत बेदरे सर्व नगसेवक पदाधिकारी कार्यकर्ते आदीसह मंगळवेढा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, नवा तरूण, उमदा उमेदवार तुम्हाला दिलेला आहे. आता मात्र तुमची जबाबदारी आहे. आजपर्यंत भारत नानांनी चांगले काम केल्याने भगिरथ भालकेंना वातावरण चागंले असुन विजय आपलाच आहे.

म्हैसाळ टेंभु योजनांचा प्रश्न मिटेल, महात्मा बसवेश्वर स्मारक प्रश्न मार्गी लागेल, 35 गावापैकी 24 गावांसाठी दोन टीएम सी पाणी देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे काम भगिरथ भालकेंच्या माध्यमातूनच पुर्ण होणार आहे. सर्वे करण्याचे टेंडर निघाले असुन आचारसंहीतेमुळे रखडले असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

दामाजी कारखान्याच्या सभासदांचा हक्क ज्यांनी काढून घेण्याचा प्रयत्न केला त्या एकोणविस हजार सभासदांचे हक्क रद्द होऊ नये म्हणून भगिरथ भालके हे पहिल्यांदा आमदार झाल्यावर मोर्चा काढून सभासदांना न्याय देतील असे आश्वासन पाटील यांनी दिले.

पालकमंत्री दत्ता मामा भरणे, उत्तम जानकर, उमेश पाटील, भगिरथ भालके आदिंनी आपले मनोगतं व्यक्त केले. शिसेना नेते गणेश वानकर यांनी मंगळवेढ्यातील शिवसेना पक्षाचा पाठिंबा असल्याचा ठराव यावेळी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लतिफभाई तांबोळी यांनी केले.

Leave a Reply

error: Content is protected !!