भैरवनाथ शुगर गत हंगामातील दर 2511 चा

यंदा 6 लाख टन गाळप उद्दिष्ट : ७ वा गळीत हंगाम शुभारंभ उत्साहात

रड्डे : दत्ता कांबळे

भैरवनाथ शुगरने गळीत हंगाम २०१९-२० मधील ऊस बिल एफआरपी प्रमाणे पूर्ण दिलेले आहे. तसेच गेल्या वर्षीची दुष्काळी परिस्थिती व कोरोना रोगाचा प्रादुर्भाव यामुळे शेतकर्‍यांचे झालेले नुकसान यामुळे कारखाना गेल्या वर्षी गळीतास आलेल्या ऊसास २५११ प्रमाणे ऊस दर देणार असून या पूर्वी २००० रुपये ऊस दर दिला आहे. उर्वरित ५११ रुपये लवकरात लवकर शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल अशी ग्वाही भैरवनाथ शुगर चे चेअरमन प्रा शिवाजी सावंत यांनी दिली.

लवंगी ( ता . मंगळवेढा ) येथील भैरवनाथ शुगरचा ७ वा गळीत हंगाम शुभारंभ भैरवनाथ शुगरचे चेअरमन मा.प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते मोळी टाकून करण्यात आला. यावेळी व्हा.चेअरमन अनिल सावंत उपस्थित होते. सुरवातीस चेअरमन शिवाजीराव सावंत व जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. तसेच ऊस वाहतूक वाहनांचे पूजन व्हा.चेअरमन अनिल सावंत व HPCL चे अधिकारी पियुष पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. सत्यनारायण पुजा श्री.तानाजी चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सविता चव्हाण यांचे शुभहस्ते करण्यात आली.

यावेळी बोलताना व्हा.चेअरमन मा.अनिल सावंत यांनी, आ.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट दिलेले आहे ते आम्ही पूर्ण करू असे सांगितले. तसेच या वेळी चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांचा आज वाढदिवस असलेने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने पुष्पहार घालून व केक कापून साजरा करण्यात आला.


यावेळी एक्झ्युकेटीव डायरेक्टर मा.अविनाश वाडेकर, विहाळ युनिटचे कार्यकारी संचालक किरण सावंत, जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे, प्रक्रिया विभागाचे जनरल मॅनेजर अनिल पोरेे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ.शैलाताई गोडसे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुधीर अभंगराव, शिवसेना तालुका प्रमुख पंढरपूर महावीर देशमुख ,शहर प्रमुख रवी मुळे, उपशहर प्रमुख तानाजी मोरे, शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम भोजने, राजू पाटील, आप्पा जाधव, रमेश चोपडे, रामकृष्ण चव्हाण, कृष्णा निकम, मनोहर चव्हाण,शाम गोगाव,बंडू जाधव, च्ंद्रकांत देवकर, इंद्रजीत पवार, अधिकारी व कर्मचारी यांच्यासह या भागातील ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी-वाहतूकदार उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!