भैरवनाथ विद्यालयाच्या प्रशासकीय अधिकारीपदी डॉ. बिभीषण रणदिवे

पंढरपूर : ईगल आय मीडिया

सरकोली ( ता.पंढरपूर ) येथील भैरवनाथ विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकारी तथा प्राचार्य म्हणून शिक्षण विस्ताराधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नुकताच डॉ. बिभीषण रणदिवे यांनी पदभार स्वीकारला यावेळी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने डॉ. रणदिवे यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. रणदिवे यांना पंढरपूर तालुक्याचे शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज सांभाळत असतानाच या संस्थेत प्राचार्य पदाचा अतिरिक्त कारभार पहावा लागणार आहे.’

यावेळी बोलताना डॉ. रणदिवे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी शाळेत उपस्थित नसले तरी सर्व विद्यार्थ्यांना गुगल अॅप,मीट अॅप,चिली मिली कार्यक्रम, शिक्षक- विद्यार्थी ग्रुप करून सर्व विद्यार्थ्यां शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. तसेच 5 वी व 8वी शिष्यवृत्ती ,8 वी NMMS परीक्षा व 10 वी NTS परीक्षा यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना सर्व शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे नियोजन व कार्यवाही करण्यात येईल असेही डॉ. रणदिवे म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!