उद्या कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !


उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बांधणार घड्याळ


पंढरपूर : ईगल आय मीडिया


भाजपचे नेते आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे उद्या ( दि. 8 ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.


पंढरपूर, सांगोला,माढा, मोहोळ विधानसभा मतदारसंघात प्रभाव असणारे कल्याणराव काळे उद्या भाजपचे कमळ चंद्रभागेत सोडून देत आहेत. आणि काळाबरोबर पुढं जाण्याच्या हेतूने राष्ट्रवादी चे घड्याळ हातावर बांधणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश समारंभ होत आहे. गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता हा कार्यक्रम श्रीयश पॅलेस येथे संपन्न होत आहे.


विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप ला हा मोठ्ठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला रोज एक नवीन धक्का बसतो आहे. स्टार प्रचारक आ.रणजितसिंह मोहिते पाटील बुधवारपासून कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रचारापासून अलिप्त झाले आहेत. मंगळवेढा येथे भाजपमध्ये बँड झाले आहे. उमेदवार समाधान अवताडे यांचे बंधू निवडणूक मैदानात उतरले आहेत.

त्यामुळे मंगळवेढा तालुक्यात भाजपची ताकद कमी झालेली असतानाच पंढरपूर तालुक्यातही काळे यांच्या पक्ष सोडण्याने भाजपला आणखी एक धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!