पंढरपूर : ईगल आय मीडिया
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भाळवणी पंचायत समिती गणातील जैनवाडी, धोंडेवाडी या गावात शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्यावतीने आर्सेनिक अलबम -३० या गोळ्याचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना संभाजी शिंदे म्हणाले, सध्या जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. पंढरपुरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोना बाधीत रुग्ण वाढत आहेत. या कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी या गोळ्यांचा उपयोग होत आहे.
यावेळी जैनवाडीतील ५०० कुटुंब व धोंडेवाडी तील ८०० कुटुंबासह गावातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मदतीने या गोळ्याचे वाटप करण्यात येत आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड. दिपक पवार,जैनवाडीचे सरपंच हणमंत सोनवणे, विलास गोफणे, अशोक मिरजे, किरण दानोळे, नागनाथ खरात, धोंडेवाडीचे सरपंच संभाजी देठे, औदुंबर देठे, लक्ष्मण देठे, ब्रह्मदेव इंगळे, पोलीस पाटील तानाजी जाधव, बापूराव गायकवाड व सदस्य,ग्रामसेवक अविनाश ढोपे, भैय्या पटेल, महेश इंगोले, बबन साठे व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.