भाळवणीच्या सरपंचपदी विठ्ठल चौगुले

तर उपसरपंचपदी पुनम गवळी यांची निवड

पंढरपूर : ईगल आय मीडिया


भाळवणी ( ता.पंढरपूर ) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वभिमानी विकास पॅनलचे विठ्ठल बापू चौगुले यांची, तर पुनम दीपक गवळी यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.


आज सरपंच व उपसरपंच निवडीसाठी आयोजित सदस्यांच्या बैठकीत 12 वाजे पर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ब्रह्मानंद घाडगे यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आले होते. सरपंचपदासाठी विठ्ठल चौगुले यांचा 1 च अर्ज आला होता, तर उपसरपंच पदासाठी पुनम गवळी यांचाही 1 अर्ज आला होता.

यानंतर घाडगे यांनी 2 वाजता सरपंचपदी विठ्ठल बापू चौगुले यांची तर उपसरपंचपदी पुनम दीपक गवळी यांची निवड घोषित केली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, पांडुरंगचे माजी संचालक हरिभाऊ शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती भगवानराव चौगुले, दीपक गवळी, ज्ञानेश्वर गवळी दाऊद शेख, शकील काझी आदि मान्यवर उपस्थित होते.


यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तलाठी विजय शिवशरण, ग्राम विकास अधिकारी प्रशांत कुंभार, पोलीस पाटील अर्जुन गवळी यांनी सहकार्य केले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!