भाळवणीत निंबाळकर वाड्यातील ऐतिहासिक विहीर चक्क वाहू लागली

350 वर्षांचे वडाचे झाडही कोसळले

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भाळवणी ( ता. पंढरपूर ) येथील ऐतिहासिक निंबाळकर वाड्यातील विहीर पावसाच्या पाण्यामुळे चक्क ओसंडून वाहू लागली आहे. तर याच वाड्यासमोर असलेले सुमारे 350 वर्षांपूर्वी चे वडाचे झाड जमीनदोस्त झाले आहे.

मागील काही दिवसांपासून पंढरपुर तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. कशुक्रवारी पटवर्धन कुरोली, आणि भाळवणी ( ता.पंढरपूर ) मंडलात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे भाळवणी तेथील ऐतिहासिक निंबाळकर वाड्यासमोरील ३५० वर्षे जुने वडाचे झाड उन्मळून पडले आहे. वाड्यातील ऐतिहासिक विहीर अतिवृष्टीमुळे वाहू लागली आहे.


यावर्षी पंढरपुर तालुक्यात विक्रमी पाऊस पडला आसून अनेक पिकात, घरात पाणी जाऊन पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र या अतिवृष्टी मूळे तालुक्यातील काही ऐतिहासिक वस्तुंना ही फटका बसल्याचे दिसत आहे. शुक्रवार झालेल्या आतुवृष्टी मुळे भाळवणी येथील ऐतिहासिक निंबाळकर वाड्यासमोरील 350 वृषापूर्वी चे वडाचे झाड जमीन दोस्त झाले आहे. तर याच ऐतिहासिक वाड्यातील पाण्याची विहीर इतिहासात प्रथमच ओसंडुन वाहू लागली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!