भंडीशेगावात 37 कोरोना पॉझिटिव्ह : 7 दिवसांसाठी गाव बंद


एकाच दिवशी सापडले 21 : आजवर 1 महिला मयत

पंढरपूर : ईगल आय मीडिया
तालुक्यातील भंडीशेगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल 37 झाली आहे. तर गावात मागील महिन्यात 70 वर्षीय महिलेचा मृत्यू कोरोनामुळेच झाला आहे. एवढ्या मोठया संख्येने रुग्ण सापडल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. तसेच 7 दिवस गाव बंदचे आवाहन केले आहे.

भंडीशेगावात जुलैच्या मध्यापर्यंत एकही कोरोना रुग्ण सापडला नव्हता. मात्र जुलै च्या शेवटच्या आठवड्यात एक दाम्पत्य पॉझिटिव्ह आढळून आले, तसेच त्याच कुटुंबातील एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यूही कोरोनामुळेच झाला. त्यापैकी पॉझिटिव्ह दाम्पत्य आता बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान मागील आठवड्यात गावात एकाच परिसरात 8 लोक पॉझिटिव्ह आढळून आले.तर 8 ऑगस्ट रोजी 8 आणि 9 ऑगस्ट रोजी केलेल्या रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये तब्बल 21 लोकांचे निष्कर्ष कोरोना पॉझिटिव्ह आल्याने गावातील एकूण बाधितांची संख्या 37 एवढी झाली आहे.
बहुतांश रुग्ण एकाच वार्डातील आहेत, आणि हे सर्व एकमेकांच्या संपर्कातील असल्याचे प्राथमिक माहितीनुसार समजते. ग्रामपंचायत प्रशासनाने 15 ऑगस्टपर्यंत गाव पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ग्रामस्थांना सम्पर्क टाळण्याचे, विनाकारण घराबाहेर न पडण्याचे, स्यानेटाईझर वापरण्याचे आणि लक्षणे दिसत असतील तर तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

One thought on “भंडीशेगावात 37 कोरोना पॉझिटिव्ह : 7 दिवसांसाठी गाव बंद

Leave a Reply

error: Content is protected !!