भंडीशेगाव येथे बिबट्या आला ?

बिबट्या सदृश्य प्राण्याने चव्हाण मळा येथे गाय मारली

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भंडीशेगाव ( ता.पंढरपूर ) येथे बिबट्या सदृश्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यात एक गाईचा मृत्यू झाला आहे. तर बिबट्या आल्याच्या चर्चेने शेतकर्यांमध्ये घबराट पसरली आहे.

भंडीशेगाव येथील चव्हाण मळा येथे नितीन चव्हाण यांची जर्सी गाय बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटे च्या दरम्यान पाठीमागील बाजूने हल्ला करून ठार केलेली आहे. गाय शेतात बांधलेली होती आणि रात्री तिथे कोणी नसल्याने हल्ला नेमका कोणत्या प्राण्याने केला हे सांगता येत आणि.मात्र बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केला असावा असे शेतकरी सांगत आहेत.

दोन दिवसांपूर्वी प्रवीण चव्हाण या तरुणाने आपल्या शेतात बिबट्या सदृश्य प्राणी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. त्यानंतर या संदर्भात वन विभागास कळवण्यात आले होते. वन विभागाच्या पथकाने येऊन पाहणी केली मात्र बिबट्याचे ठसे आढळून आले नव्हते.

मात्र बुधवारी रात्री बिबट्या ज्या पद्धतीने शिकार करतो, त्याच पद्धतीने गाईवर हल्ला करून ठार करण्यात आले आहे. तसेच बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसे आसपास उमटलेले आहेत. त्यामुळे बिबट्याच आला असल्याचे शेतकरी खात्रीशीर सांगत आहेत.

आजही वनविभागाला कळवण्यात आले असून या प्राण्याचा बंदोबस्त तातडीने केला जावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. आता ऊस गाळप हंगाम सुरू होत असताना पुन्हा एकदा बिबट्याचे संकट आल्याने शेतकऱ्यांतून घबराट पसरली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!