उपसरपंचपदी विजय कदम यांची निवड
पंढरपूर : ईगल आय मीडिया
भंडीशेगाव (ता.पंढरपूर ) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. मनीषा प्रकाश येलमार यांची तर उपसरपंचपदी विजय जयप्पा कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडणुकीत परिचारक व भालके गटाची युती झाली होती.या आघाडीचे 13 सदस्य पैकी 11 सदस्य निवडून आले होते.तर
विरोधी काळे गटाला फक्त 2 जागा मिळाल्या होत्या.
27 जानेवारी च्या आरक्षण सोडतीमद्ये सरपंचपद हे अनुसूचित जाती साठी आरक्षित होते. परंतु नंतर च्या ड्रॉ मध्ये सर्वसाधारण महिला झाल्यामुळे सरपंचपदासाठी चुरस निर्माण झाली होती.
परंतु सर्वसंमतीने सरपंच व उपसरपंच या दोन्ही निवडी मात्र बिनविरोध झाल्या आहेत. निवडीनंतर सर्व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.