सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
टीम : ईगल आय मीडिया
केंद्र सरकारने केलेल्या 3 कृषी कायद्याविरोधात दिल्ली मध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून उद्या करमाळा येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना मित्रपक्ष यांच्या वतीने ही बंद ला पाठिंबा दर्शवला आहे.
देशभरात विविध राजकिय पक्ष, सामाजिक संघटनांनी ( दि. ८ डिसेंबर ) रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर भारत बंद मध्ये सहभागी होऊन करमाळा तालुक्यातील विविध पक्ष व संघटनांनीही शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. तरी सर्वांनी उद्या (दि. ८ डिसेंबरच्या ) भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी सकाळी ८ वा. सुभाष चौक, करमाळा येथे जमावे, असे आवाहन दशरथ कांबळे, ॲड. सविता शिंदे, सुनील सावंत, रवींद्र गोडगे,
ॲड. राहुल सावंत, डॉ.अमोल दुरंदे, हनुमंत मांढरे-पाटील ,शिवराज जगताप , नितीन खटके, सुधाकर लावंड यांनी केले आहे.
या बंद मध्ये काँग्रेस आय.राष्ट्रवादी काँग्रेस. शिवसेना व मित्र पक्ष यांनी भारत बंद साठी पाठिंबा देऊन सहभागी होण्याचे ठरवले आहे तरी करमाळा शहरातील सर्व व्यापारी बंधू ने बंद मध्ये सामील होऊन सहकार्य करावे सदर बंद ला पाठींबा देण्यासाठी उद्या सकाळी नऊ वाजता महात्मा गांधी पुतळा पोथरे रोड येथे उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडी च्या वतीने करण्यात आले आहे
सुनील बापु सावंत .सुधाकर काका लावंड. शिवराज जगताप, प्रवीण कटारिया. ऍड. राहुल सावंत, विजय लावंड अरूणकाका जगताप संतोष वारे. संजय शिंदे, निलावती ताई कांबळे, सौ.तृप्ती साखरे, रविद्र गोडगे, संजय सावंत, अतुल फंड, अल्ताफ शेठ ताबोंळी,सचिन घोलप, अभिषेक आवाड, राजेंद्र आवाड, गोविंद किरवे,सौ.नलिनी जाधव, महेश काळे, हनुमंत मांढरे, फारूक जमादार, फारूक बेग, गौरव झांझुणे, शौकत नालबंद,राजेंद्र काळे, सचिन काळे आदींनी आवाहन केले आहे.