पटवर्धन कुरोली,खेडभोसे, आव्हे, देवडे परिसरात पुरामुळे दैना

गावांना पुराच्या पाण्याचा वेढा : नागरिकांचे हाल : पिकांचे मोठे नुकसान

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील पटवर्धन कुरोली, देवडे, खेडभोसे, आव्हे, पिराची कुरोली, शेळवे, खेडभाळवणी, कोठाळी, शिरढोन, व्होळे, गुरसाळे या गावातील नागरिकांची दैना उडाली आहे. पाण्याची पातळी अतिशय वेगाने वाढल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकांचे घरातील साहित्य घरातच अडकून पाण्यात गेले आहे.

भीमा नदीमध्ये उजनी आणी वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने पुरस्थिती निर्माण झाली असून या महापुराचा अनेकांना फटका बसला आहे. बुधवारी दुपार पासून भीमेच्या पात्रात हळूहळू वाढ होण्यास सुरूवात झाली. तर गुरुवारी वेगाने वाढ झाली. सायंकाळी पिराची कुरोली – पट कुरोली, गुरसाळे येथील बंधारा पाण्याखाली गेल्याने पटवर्धन कुरोली व पिराची कुरोली या दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे. तर व्होळे पाटी ते देवडे जोडणाऱ्या मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने व्होळे, देवडे, खेडभोसे या गावांचा पंढरपूर चा संपर्क तुटला आहे.

व्हीडिओ पहा आणि चॅनेल subscribe करा !

गुरूवारी भीमेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. नदीकाठच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नदिकाठी असणारी उस, केळी, मका, हि पिके पूर्णपणे पाण्यात गेली आहे. कारखाना सुरु होण्याच्या काळातच हातातोंडाशी आलेली उस पिके पाण्यात गेल्याने शेतकऱी हवालदिल झाले आहेत. तसेच अनेक घरामध्ये पाणी गेल्यामुळे संसार उपयोगी सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.

खेड भोसे गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला
खेड भोसेगावाला पुराच्या पाण्याने वेढा टाकला असुन सतत वाढत आहे.खेड भोसेयेथील सर्व नागरिकांना सुगावा खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे हलवण्यात आले आहे. ‌ पूर्णपणे पाण्यामध्ये असून त्या ठिकाणी नागरिकांना काही क्षणातच घर सोडले आहे. नागरिकांना लहान लेकरांसहित रस्त्यावर यावे लागले. पाणी कमी होण्याची वाट बघत आहेत, घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्या ठिकाणी नागरिकांची खूप धावपळ होत आहे ,आवश्यक असणारे सर्व वस्तू पाण्यामध्ये वाहून गेले असून त्या ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पटवर्धन कुरोली येथील वीस ते पंचवीस कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यात आठ ते दहा फूट पाणी आहे. तसेच येथील प्रशालेच्या सर्व खोल्यांना पुरांच्या पाण्याने वेढले आहे. पटवर्धन कुरोली येथील व्यापारी गाळ्यामध्ये पाणी घुसल्याने अनेक व्यापार्यांच्या मालाचे नुकसान झाले आहे.

आव्हे येथे उस तोडणीसाठी आलेली टोळीच्या कोप्यात पुराचे पाणी गेल्यामुळे त्यांचे अतोनात हाल झाले. एकीकडे पाऊस आणि दुसरी कडे पुर यामुळे संसारोपयोगी साहित्य काढता आले नाहि. चिखलातुन साहित्य काढताना उस कामगारांचे मोठे हाल झाले.

Leave a Reply

error: Content is protected !!