उजनी वगळता सर्वच धरणे प्लस च्या पातळीत
13 जून रोजी भीमा खोऱ्यातील धरणात असलेला पाणी साठा दर्शवणारा तक्ता.
टीम : ईगल आय मीडिया
गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच भीमा खोऱ्यातील उजनी वगळता सर्वच धरणांचा पाणी साठा प्लसच्या पातळीवर असल्याचे दिसून येत आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अशी परिस्थिती अपवादात्मक असल्याने यंदा ही भीमा काठी पूर स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
यंदाचा पावसाळा सुरू झाला असून भीमा खोऱ्यात अपेक्षेप्रमाणे पावसाने हजेरी लावलेली आहे.गतवर्षी प्रमाणे यंदाही पाऊस अगदी वेळेवर आल्याने भीमा खोऱ्यातील सर्वच धरणातील पाणी साठा वाढू लागला आहे.
उजनी धरण उणे 24 टक्के वरून उणे 17 टक्के पर्यंत वाढले आहे. तर पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणात प्लस पाणी साठा आहे. दोन वर्षांपूर्वी जुलै महिन्यात सुद्धा जी धरणे उणे पातळीला होती ती यंदा 13 जून रोजीच सरासरी 20 टक्के हुन अधिक भरलेली आहेत. खडकवासला 41, पानशेत 31 तर मुळशी 6 टक्के अशी मोठी धरणे सुद्धा अधिकच्या पातळीला आहेत.
हवामान विभागाच्या भाकिता प्रमाणे जर पाऊस पडला तर जुलै महिन्यातच ही धरणे यंदा भरून वाहण्याची शक्यता आहे. पावसाळ्याचे सुमारे 4 महिने पुढे असल्याने सुरुवातीलाच असलेली ही धरणातील पाणी साठा परिस्थिती यंदाही भीमा नदीला पुर स्थिती निर्माण होण्याची संकेत देत आहेत.