या पॅनेलनला मोठी आघाडी मिळण्याची शक्यता
सोलापूर : ईगल आय न्यूज
संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. हाती आलेल्या सुरुवातीचे कल पाहता खा. धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला आघाडी मिळत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे मंगळवेढा, पंढरपूर आणि मोहोळ या तिन्ही गांवातील आघाडीचा कल जवळपास असाच असल्याचे चित्र आहे.
पहिल्या फेरीत २८ बुथवर महाडिक यांच्या पॅनेलला मोठी आघाडी
हाती आलेल्या माहितीनुसार अंबेचिंचोली, पुळूज, पुळूजवाडी, शंकरगाव, विटे, उचेठाण, बठाण, ब्रह्मपुरी, औंढी, टाकळी, पेनूर, पाटलूक, वरकुटे, तांबोळे, सौंदने, मगरवाडी, तारापूर या गावातील बुथवर १४ ते २९१ अशा मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे एकूणच भीमा सहकारी साखर कारखान्यात पुन्हा एकदा महाडिक गट सत्ता राखण्याची शक्यता दिसत आहे.
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी चुरशीने प्रचार आणि ७८ टक्के इतके मतदान हि झाले आहे. सोमवारी सकाळी मतमोजणीला झाली असून पुळूज गटाची मोजणी सुरु झालेली आहे. यामध्ये काही गावातील प्राथमिक कल हाती आले आहेत. त्यानुसार सत्ताधारी महाडिक गटाने ३ हजार ५०० हुन अधिक मतांची आघाडी घेतल्याचे समजते. या मताधिक्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही मात्र काही गावातील मतांची आकडेवारी पाहता महाडिक यांचे पॅनल मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.