जोर ओसरला : पावसाचा आणि येणाऱ्या पाण्याचा ही

उजनी धरणाची वाटचाल संथ

टीम : ईगल आय मीडिया

पुणे जिल्ह्यातील धरणांवर मागील 2 दिवसात अपेक्षेनुसार पाऊस झालेला नाही, त्यामुळे उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा आणि उजनीत येणाऱ्या पाण्याचा ही जोर ओसरला आहे. परिणामी उजनीच्या पाणी साठ्यात किरकोळ वाढ होत असून आज सकाळी धरण 83.51 टक्के भरले आहे.

आज सकाळी 8 वाजता धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग असा आहे.

काल ( बुधवारी ) पावसाने विश्रांती घेतल्याने आजपासून धरणात येणारा विसर्ग एकदम कमी होण्याची शक्यता आहे. धरणाच्या पूर्ण क्षमतेचा विचार केला तर उजनी अजूनही 27 टक्के भरण्यास वाव आहे.

त्यामुळे परतीच्या पावसाने किमान 4 दिवस तरी दमदार बरसने आवश्यक आहे. पावसाळ्याचे दिवस कमी उरले आहेत, त्यामुळे उर्वरित दिवसात किती पाऊस पडणार आणि धरण कधी भरणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!