पंढरपूर मध्ये भोसले चौकात गोदामास आग

पंढरपूर : ईगल आय मीडिया

येथील कर्नल भोसले चौकातील गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या काही दुकानांना आज ( गुरुवारी ) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेने आगीवर नियंत्रण मिळवून विझवल्या ने फारशी मोठी हानी झाली नाही.

आगीच्या घटनेचा vdo पहा

प्राथमिक माहितीनुसार या आगीत मोटारसायकल गैरेंज मधील तीन ते चार मोटरसायकल व गैरेंजचे साहित्य आणि काशिकापडी समाजाच्या दुकानातील दुकानातील जुने कपडे जळून खाक झाले आहेत. परंतु सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.

पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याने साखर झोपेत असलेल्या या सगळ्या परिसरातील लोकांमध्ये खूप मोठा गोंधळ उडाला. चारच्या सुमारास माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आज विझविण्याचे काम सुरू केले .जवळपास सहा वाजेपर्यंत विझविण्याचे काम सुरू होते . या आगीत कापडी मालाचे मोठे नुकसान झाले तसेच त्याच्या शेजारी असलेल्या गॅरेज पर्यंत आग पसरली .

काशीकापडी समाजाच्या माध्यमातून येथे जुने कपडे गोळा करून ते विकण्याचे काम केले जाते , हा सगळा माल एका ठिकाणी गोदामात ठेवला गेला होता . आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. परंतु या कापडी चिंद्यांनी पेट घेतल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात वाढत गेली. शेजारी असलेल्या मोहिते हॉस्पिटल आणि गॅरेज पर्यंत पसरत चाललेली आग आटोक्यात आल्याने मोठी हानी टळली.
यावेळी भोसले आणि त्यांच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. आग लागल्याचे समजताच नगरपरिषदेच्या अग्निशामक बंबानी दोन तासांत आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेेेेे नाही.

Leave a Reply

error: Content is protected !!