भोसे गावात 43 पॉझिटिव्ह रुग्ण

गाव 7 दिवस कडकडीत बंद

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भोसे ( ता. पंढरपूर ) या गावात दोन दिवसात तब्बल 43 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बुधवार (दि. 5) ते मंगळवार (दि.11) असे सात दिवस भोसे गाव कडकडीत बंद ठेवण्यात यात आहे, तरी सर्व भोसे ग्रामस्थांनी सहकार्य करुन बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन भोसे कोरोना ग्रामस्तरीय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

भोसे गावच्या हद्दीत यापूर्वी 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होईल त्यामुळे गावात उपाययोजना करूनही गेल्या 4 दिवसांत गावात कोरोनाचा फैलाव पुन्हा झाला आहे.
भोसे येथे बुधवारी शंभराहून अधिक लोकांची रॅपिड अंटिजेन टेस्ट घेण्यात आली, यात 28 रुग्ण आढळून आले. तर गुरुवारी (दि. 6) पुन्हा रॅपिड अंटिजेन टेस्ट घेण्यात आली असून यात 15 positivh रुग्ण सापडले आहेत.

एकाच गावात दोन दिवसात एवढे रुग्ण सापडल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गाव 7 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. यात 7 दिवस भाजीमंडई भरणार नाही. मात्र शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दूध संकलन सकाळी 7 पर्यंत आणि रात्री 7 ते 8 पर्यंत करण्यात येणार आहे असे ग्राम स्तरीय समितीच्या वतीने सांगण्यात आले.

गावातील सर्व दवाखाने 24 तास उघडे राहतील. मात्र सर्व मेडीकल बंदमध्ये 7 दिवस सकाळी 8 ते 10 दोन तास उघडी राहातील.

अत्यावश्यक असेल तर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतमध्ये संपर्क करावा त्यांच्यासाठी मेडीकल उघडून औषध -गोळ्या देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

या 7 दिवस भोसे बंद काळामध्ये ग्रामस्थांनी चौकात, सार्वजनिक ठिकाणी, गल्लीत, एकत्रित गर्दी करून बसु नये तसेच ग्रामस्थांनी मोटारसायकल वरून काहीही काम नसताना गावातून विनाकारण फिरू नये, तसे आढळल्यास 14 दिवसासाठी पंढरपूर येथे कॉरनटाईन केले जाईल, असा इशारा कोरोना ग्रामस्तरीय समितीने दिला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!