पंढरपूर तालुक्यात बिबट्या सदृश्य प्राणी आला !

तालुक्यात फिरतोय सावधानतेचा जुना मेसेज

पंढरपूर : ईगल आय मीडिया

वन परिक्षेत्र कार्यालय,पंढरपूर च्या नावे तालुक्यातील काही गावात बिबट्या सदृश्य प्राणी आला असून सावधानतेचे आवाहन करणारा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे.मात्र हा मेसेज दोन वर्षांपूर्वी चा असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन वन विभागाने केले आहे.

करमाळा तालुक्यात सध्या बिबट्या आलेला असून त्याने 3 नागरिकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांत घबराट पसरलेली आहे. दोन वर्षांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील काही गावांत बिबट्या सदृश्य प्राणी दिसून आला होता, त्याने काही जनावरे मारली होती. त्यामुळे आपल्याकडे पुन्हा बिबट्या येतो की काय अशी चिंता व्यक्त होत आहे.

फेसबुक, व्हाट्स अप वर हा मेसेज फिरत असून नागरिकांतून चिंता व्यक्त होत आहे. यासंदर्भात वन विभागाचे वनक्षेत्रपाल विलास पोवळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अशा प्रकारे पंढरपूर तालुक्यात कुठलाही वन्य प्राणी आढळून आलेला नाही, हा मेसेज जुनाच असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.

या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून वन विभागाच्या नावे एक फोटोशॉप इमेज सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यामध्ये नागरिकांना सावधानतेचा ईशारा देण्यात आलेला आहे. पटवर्धन कुरोली, वाखरी, गादेगाव, भाळवणी, पळशी या पंचक्रोशी परिसरात बिबट्या सदृश्य वन्य प्राण्याचे वास्तव्य निदर्शनास आले असून तमाम जनतेने सतर्कता बाळगावी, याविषयी काही माहिती मिळाल्यास वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन या संदेशात करण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!