नाव मोठे आणि लक्षण खोटे
टीम : ईगल आय मीडिया
राज्यात शेतक-यांची फसवणूक करणा-या ४४ कारखान्यांची यादी साखर आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यातील अनेक आजी – माजी राजकीय पुढारी, मंत्री,बडे नेते या कारखान्याचे संचालक आहेत. शेतक-यांची एफआरपी वेळेवर न देणे, वजन करताना शेतक-यांची फसवणूक करणे असे विविध आरोप संबंधित कारखान्यांवर लावण्यात आले असून या कारखान्यांना लाल यादीत समाविष्ट केले आहे. त्यामुळे येथून पुढे शेतक-यांनी संबंधित कारखान्यांना ऊस घालताना ही यादी लक्षात ठेवावी, असे आवाहनही साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे.
राज्यातील राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस सह अनेक बड्या पुढा-यांचा संबंधित कारखान्यांशी संबंध आहे. माजी महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, 20 वर्षे मंत्री राहिलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप आमदार समाधान औताडे, दिवंगत आम.भारत भालके, माजी खा.धनंजय महाडिक, शेकापचे नेते जयंत पाटील, माजी.आम.सिद्धाराम म्हेत्रे, माजी आम. दिलीप माने, आम.संजय शिंदे, माजी आम.शामल बागल अशा दिग्गज नेत्यांचे, किंवा ते संचालक असलेले कारखानेदेखील लाल यादीत समाविष्ट केले आहेत.
सिद्धेश्वर सहकारी, (कुमठे-सोलापूर),( संत दामाजी, मंगळवेढा), विठ्ठल सहकारी, (गुरसाळे, पंढरपूर), मकाई करमाळा, लोकमंगल अॅग्रो, (बीबीदारफळ,सोलापूर) लोकमंगल शुगर, (भंडारकवठे,सोलापूर) सिद्धनाथ शुगर, (तिरहे, सोलापूर), गोकुळ शुगर,( धोत्री, सोलापूर), मातोश्री लक्ष्मी, (अक्कलकोट सोलापूर,) जयहिंद शुगर, (आचेगाव द. सोलापूर), विठ्ठल रिफाईन्ड, (पांडे, करमाळा,) गोकुळ माऊली शुगर (तडवळ, अक्कलकोट,) भीमा सहकारी,( टाकळी सिकंदर, मोहोळ), सहकार शिरोमणी, (भाळवणी पंढरपुर) , वैद्यनाथ सहकारी सा. का. (परळी, ) वैद्यनाथ परळी-पंकजा मुंडे, लोकमंगल सोलापूर, सुभाष देशमुख यांचे ३ कारखाने, एच जे शुगर, रावळगव, जयंत पाटील शेकाप, यांच्या साखर कारखान्यांचा साखर आयुक्तांनी लाल यादीत समावेश आहे.