राज्य सरकार विरोधात जनतेच्या मनात रोष

पंढरपूर मध्ये भाजप उमेदवार विजयी होणार : आ. पाटील यांचा दावा


पंढरपूर : ईगल आय मीडिया

राज्यात कोरोना हाताळण्यात आलेले अपयश, वाझे प्रकरणामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात या सरकार विषयी प्रचंड रोष असून पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत हा रोष बाहेर पडेल आणि भाजपाचा उमेदवार विजयी होणार आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.


पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने समाधान आवताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाा. पंढरीत या नंतर भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह खा रणजितसिंह निंबाळकर, खासदार जयसिध्देश्‍वर स्वामी, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी मंत्री सुभाष देशमुख, राम शिंदे व प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राम सातपुते, सचिन कल्याणशेट्टी, संभाजी निलंगेकर, नगराध्यक्षा साधना भोसले, उपसभापती राजश्री भोसले, आरपीआयचे राजाभाऊ सरवदे, डॉ.बी.पी.रोंगे आदी उपस्थित होते.


पंढरपूर येथे होणार्‍या पोटनिवडणुकीत परिचारक व आवताडे हे दोन गट एकत्र आल्याने आमचा विजय निश्‍चित आहेच. तसेच सरकार वरील नाराजीमुळे मतांची आघाडी आणखी वाढणार असल्याचा विश्‍वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.


यावेळी बोलताना पाटील यांनी, हे सरकार स्थापन झाल्या पासून सर्वसामान्यांना फसवत असल्याचा आरोप केला. अतिवृष्टी मदत, कोरोना काळातील अपयश, वीज तोडणी व आता वाझे प्रकरण या सर्वांचा परिणाम म्हणूनच नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेच्या या सरकारच्या विरोधात कौल दिला.

Leave a Reply

error: Content is protected !!