मंगळवारी भाजपचा मेळावा होणार
पंढरपूर : ईगल आय मीडिया
भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी श्रीयश पॅलेस येथे कार्यकर्ता मेळावा सुद्धा आयोजित केला आहे.
राष्ट्रवादीचे दिवंगत आ. भारत भालके याच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी कडून भालके विरुद्ध अवताडे असा सरळ सामना रंगणार आहे.
समाधान अवताडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खा. विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री विजय देशमुख, सुभाष देशमुख, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह नेते उपस्थित राहणार आहेत. आलिशान श्रेयस पॅलेस कार्यालयात मेळावा होणार आहे.
पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार असलेले समाधान आवताडे यांनी 2014 ला शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर 2019 ला ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आमदार परिचारक गटाने समाधान अवताडे याना पाठिंबा देण्याचे मान्य करत पंढरपूर शहरासह 22 गावातून मताधिक्य देण्याचा शब्द दिला आहे.
या पोटनिवडणूकित महाविकास आघाडी कडून भालके कुटूंबातील व्यक्तीला उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत निर्माण होणार आहे.
अभिनंदन अवताडे साहेब 🌹🌹