…तर पालकमंत्री भरणे याना जिल्ह्यात फिरू देणार नाही

भाजप किसान मोर्चाच्या माऊलीभाऊ हळणवर यांचा ईशारा

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उजनी धरणातुन इंदापूर तालुक्याला प्रस्तावित केलेल ५ TMC रद्द करा, अन्यथा पालकमंत्री भरणे याना सोलापूर जिल्ह्यात फिरणे मुस्किल करु, असा ईशारा भाजप किसान मोर्चाचे राज्य सचिव माऊली भाऊ हळणवर यांनी दिला आहे.

या संदर्भात पुढे बोलताना हळणवर म्हणाले की,
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर जमिनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या, अनेक धरणग्रस्ताची गावे पंढरपूर व इतर तालुक्यात पुनर्वसीत झाली आहे. त्याचा पहिला हक्क या पाण्यावर आहे. याामुळे व सोलापूर सह अनेक शहर व गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना या धरणावर अवलंबून आहेत. त्यातच मराठवाड्याला पण पाणी जानार आहे. तरतूद केलेल्या अनेक योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

सद्या लाभक्षेत्रातील शेतकर्याच्या पिकांना पाणी मिळत नाही, हे पाणी गेले तर संपूर्ण सोलापूर जिल्हा वाळवंटासारखा ओसाड होईल, गेल्याच आठवड्यात झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेते व उपमुख्यमंत्री व अनेक मंत्र्यानी मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावच्या पाणी योजनेला उजनीतुन पाणी देणार असे आश्वासन देवुन मते मागितली होती. हि मंगळवेढ्यातील जनतेची फसवणुकच आहे.

आता रातोरात जलसंपदा विभागाने आदेश काढुन टाकाऊ साडंपाणी धरणात येत आसल्याच्या नावाखाली सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्याचे हक्काचे पाणी चोरण्याचे महा पाप केले आहे. जेव्हा – जेव्हा राज्यात राष्ट्रवादीची सत्ता येते तेव्हा ^ तेव्हा असाच अन्याय केला जातो. निरा – भाटघरचे पण पाणी बारामती ला गेले. त्याच प्रमाणे उजनीचे पाणी इंदापूर तालुक्याला गेले तर सोलापूर जिल्ह्यातील शेती व पिण्याच्या प्रश्न गंभीर होणार आहे.

स्वतः ला शेतकर्याचा तारणहार, जाणता राजा समजनारे राष्ट्रवादी चे वरिष्ठं नेते लक्ष घालतिल असे वाटत नाही. शेतकर्याच्या तरुण पोरानी उजनी वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरणे गरजेचे झाले आहे. जलसंपदा खात्याने हा आदेश तातडीने मागे घ्यावा, अन्यथा शेतकर्याच्या रोषाला सामोरे जावे लागेल. व पाणी चोरण्याचे महापाप करणार्या पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांना सोलापूर जिल्ह्यात फिरु देणार नाही, असा इशारा भाजप किसान मोर्चाचे राज्य सचिव माऊली हळणवर यांनी दिला.

Leave a Reply

error: Content is protected !!