अखेर आ. नितेश राणे न्यायालयात हजर

टीम : ईगल आय मीडिया

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे यांचा अटकूपर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळला. त्यामुळे अखेरीस भाजपाचे आमदार नितेश राणे जिल्हा आज न्यायालयात हजर झाले आहेत.

यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसंच नियमित जामिनासाठी अर्ज करावा असे निर्देश दिले होते. यासाठी कोर्टाने नितेश राणे यांना १० दिवसांची मुदत दिली होती. तसंच तोपर्यंत त्यांना अटक करु नये असे निर्देश देत दिलासा दिला होता.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, नितेश राणे आज दुपारी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. यावेळी माजी खासदार निलेश राणेही सोबत आहेत. यावेळी नितेश राणे नियमित जामीनसाठी अर्ज करतील. नितेश राणेंसोबत त्यांचे वकील सतीश मानशिंदेही उपस्थित आहेत. त्यामुळे नितेश राणेंना दिलासा मिळणार की कारवाई होणार हे पहावं लागणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!