12 जणांना जलसमाधी : मृतांची संख्या वाढण्याची भीती
टीम : ईगल आय मीडिया
राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील चंबळ नदीतून जवळपास 50 भाविकांना घेऊन निघालेली बोट आज (बुधवार) सकाळी उलटली असून यामध्ये 12 जणांना जलसमाधी मिळाली आहे. तर 30 जणांना बाहेर काढले आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
या दुर्घटनेत अद्यापपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 7 भाविकांचे मृतदेह हाती लागले आहेत. यामध्ये 6 पुरुष आणि 4 महिला आणि1 मूल आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
या बोटीत अधिक तर वयस्कर व्यक्ती, महिला आणि मुले होती. तसेच काही मोटार सायकली होत्या. जिथं बोट बुडाली तिथे पाणी 40 फूट खोल आहे, त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोटा आणि बुंदी जिल्ह्याच्या सीमेवर चंबळ नदीतून जवळपास 50 भाविकांना घेऊन ही बोट निघाली होती. दरम्यान अचानक बोट उलटल्याने ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये आतापर्यंत 7 भाविकांचे मृतदेह हाती लागले असल्याची माहिती कोटा येथील एसडीएम रामावतार बरनाला यांनी दिली आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या दुर्घटनेनतील मृतांच्या कुटुंबीयांना १ लाख रुपये तातडीची मदत जाहीर केली आहे. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी या घटनेनंतर दुःख व्यक्त केलं आहे.