बोहाळी सोसायटीच्या चेअरमनपदी सुधाकर कसगावडे

पंढरपूर : प्रतिनिधी


 बोहाळी ता.पंढरपूर येथील  श्रीराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी श्री सुधाकर लक्ष्मण कसगावडे तर अंकुश दगडू धुमाळ यांची  व्हा. चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली. 


या निवडीचे कामकाज श्री पी बी सावंत सहकारी अधिकारी श्रेणी १, यांनी पाहिले, त्यांनी याबाबत घोषणा केली . या निवडी वेळी पांडुरंग सहकारी साखर कारखाना चे संचालक भास्कर कसगावडे, राजेंद्र जाधव, बापू केसकर, ग्रामपंचायत सदस्य राजेश कुसुमडे, शिवाजी घोडके, संभाजी काळे, हरिश्चंद्र परकाळे, मोहन गोरे, राजेंद्र शिंदे, हुसेन पटवेकरी, चंद्रकांत शिंदे ई मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!