बोलेरो दरीत कोसळल्याने 8 जण ठार

15 जण जखमीना रुग्णालयात हलवले

टीम : ईगल आय मीडिया

नंदुरबारमधील सातपुडा डोंगर रांगेत तोरणमाळ-सिंदिदिगर रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणारी बोलेरो गाडी दरीत कोसळली आहे. या अपघातात  8 जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याचं समजत आहे. जीपमध्ये 30 प्रवासी होते असे समजते. अपघातामधील 15 जखमींना तोरणमाळसह अन्य स्थानिक ठिकाणच्या ग्रामीण रूग्णालयात हलवले जात आहे. 

चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच युद्धपातळीवर बचावकार्य सुरु केलं गेलंय. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

प्रवासी वाहतूक करणारी खासगी जीप सायंकाळच्या सुमारास सिंदी दिगर घाटातील दरीत कोसळली. त्यावेळी जीपमध्ये जवळपास ३० प्रवासी होती. हा अपघात एवढा भीषण होता की, जीप दरीत कोसळल्यानंतर त्या जीपचा अक्षरशा चुराडा झाला व जीपमधील आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. जीपमधील काही प्रवाशांनी जीप दरीत कोसळत असताना बाहेर उड्या टाकल्या ज्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली.

ज्या ठिकाणी हा अपघात झालाय, त्या ठिकाणी कोणत्याही मोबाईलचे नेटवर्क नाही. त्यामुळे या अपघाताची माहिती उशीरा मिळाल्याचे सांगितले जाते. तसेच नेटवर्क नसल्याने बचाव कार्य करण्यास अडथळा निर्माण होत आहे.

दरम्यान,  या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केलं आहे. तसेच पोलीस अधिक्षकांसह पोलीस आणि मदत पथक पोहोचले आहे. मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरु आहे. मात्र जखमी लोक किती आहेत याचीही अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.

Leave a Reply

error: Content is protected !!