सोलापुरात गेला, अन कोरोना घेऊन आला
मंगळवेढा : ईगल आय मीडिया
बोराळे ( ता. मंगळवेढा ) येथील एका व्यक्तीचा 08 जुलै रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील कोरोना बाधित लोकांची संख्या 2 झाली आहे. त्यापैकी एकजण पंढरपूर तर दुसरा सोलापूर येथे बाधित झालेला आहे.
याबाबत माहीती अशी की, व्यक्ती मौजे बोराळे येथील स्थानिक रहीवासी आहे तर त्याच्या कुटुंबात एकुण 5 व्यक्ती आहेत. ही व्यक्ती दि. 02 जुलै रोजी बँक कामानिमीत्त सोलापूरला गेली होती. त्याच दिवशी बँक कामकाज करुन बोराळे येथे परत आली होती. सोलापूरमध्ये ती व्यक्ती त्याच्या मित्रास भेटली. तो मित्र कोरोना पॉझिटिव्ह आलेने त्याच्याशी संपर्कामुळे बोराळे येथील व्यक्तीस दिनांक 06 जुलै रोजी त्रास जाणवु लागला. त्यामुळे त्याला सोलापूर येथील नवनीत तोष्णीवाल हॉस्पीटल येथे तपासणीसाठी नेले होते, ते आजपर्यंत तेथेचे आहेत. तेथेच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असुन त्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. अहवाल समजताच प्रशासनाने बोराळे हे गाव कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचे कामकाज प्रशासनाने सुरु केले आहे.
या व्यक्तीच्या संपर्कात आलेले high risk contacts व low risk contacts शोधणेचे कामकाज चालु करणेत आले असुन प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेतली आहे. आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. महत्वाचे कामकाजाशिवाय घराबाहेर पडु नये, घराबाहेर जात असलेस मास्क वापरणे सक्तीचे आहे. बाहेर कोणत्याही वस्तु संर्पक केल्यास स्वत:चे हात सॅनीटाईझ करावेत, चेह-याला हात स्वच्छ धुतल्याशिवाय अथवा सॅनीटाईझ केल्याशिवाय लावू नये. प्रशासनाने आतापर्यंत दिलेल्या सुचनांचे तंतोतत पालन करावे, असे आवाहन उप विभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यानी सांगितले .